महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, परळी, बीड अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 137 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे.
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
पात्रता काय?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्तऔदयोगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – विद्यावेतन शासनाच्या नियमाप्रमाणे लागू राहिल.
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडळ, जुने पॉवर हाऊस, वैद्यनाथ मंदिर रोड, परळी वै. ४३१५१५.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. उमेदवारांनी इयत्ता १० वी उत्तीर्ण चे गुणपत्रक (Marksheet) व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आयटीआय (वीजतंत्री) परिक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमीस्टरचे एकत्रित गुणपत्रक, आधारकार्ड अपलोड करणे आवश्यक आहे.
जाहिरात पहा – PDF
Discussion about this post