महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मार्फत प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2023 आहे.
सदर शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर अउदा संवसु विभाग, कोल्हापुर, सांगली, यवतमाळच्या खालील आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे आहे.
पदाचा तपशील :
कोल्हापूर – 10 पदे
कराड – 39 पदे
सांगली – 37 पदे
शैक्षणिक पात्रता – महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयाची अट : 18 वर्षे ते 30 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
वीजतंत्री (Electrician) शिकाऊ उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी हा अधिनियमानुसार 1 वर्षाचा राहिल. ऑनलाईन अर्जासाठी आवश्यक माहिती खालील अस्थापनेच्या नावे नोंदणी क्रमांकावर करणेत यावी.
अर्ज दाखल करण्याची तारीख –
कोल्हापूर – 31 जुलै 2023 (37 पदे)
सांगली – 03 ऑगस्ट 2023 (32 पदे)
यवतमाळ – 11 ऑगस्ट 2023 (25 पदे)
कोल्हापूर – 31 जुलै 2023 (10 पदे)
Discussion about this post