जळगाव महापालिकेच्या ६३ जागांसाठी महापालिकांचा निवडणुका झाल्या असून आज सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. नक्की कोणाच्या हातात महापालिकेची सत्ता येणार हे दुपारी २ वाजेपर्यंत समोर येणार आहे.
दरम्यान, सुरुवातीच्या निकालानुसार जळगाव महापालिकेत भाजप आणि शिवसेनेने आघाडी घेतली आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे आतापर्यंत तीन उमेदवार विजयी झाले तर भाजपचा एक उमेदवार विजयी झाला. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक उमेदवार विजयी झाला.
प्रभाग क्रमांक १८ ब मधून नलुबाई तुळशीदास सोनवणे आणि “क” मधून अनिता सुरेश भापसे हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार विजयी तर प्रभाग १९ मधील निकिता वंजारी विजयी झाल्या आहेत. तर एक भाजपचे राजेंद्र घुगे पाटील आणि एक राष्ट्रवादीचे प्रफुल्ल देवकर हे महायुतीचे पाच उमेदवार विजयी झाले















Discussion about this post