तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, मुंबईतील महानिर्मिती येथे भरती निघाली असून त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी उपमहाव्यवस्थापक (एचआर-आरसी/डीसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन कंपाउंड, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई-४००१९ येथे अर्ज पाठवावा लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
पदाचे नाव : मुख्य कायदेशीर सल्लागार.
नोकरीचे ठिकाण : मुंबई.
पात्रता : कायद्याची पदवी, कायद्यातील पदव्युत्तर पदवी.
वेतन / मानधन : दरमहा रु. 1,18,195/- ते रु.2,28,745/- पर्यंत.
वयोमर्यादा : 62 वर्षांपर्यंत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :16 ऑगस्ट 2024.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.mahagenco.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.















Discussion about this post