प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यामध्ये देशातील कान्याकोपऱ्यातून भाविक सहभागी झाले असून यामुळे उत्तर प्रदेशच्या सीमेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांमुळे मध्यप्रदेशात २०० ते ३०० किलो मीटरपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे सांगितले जात आहे. या वाहतूक कोंडीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
प्रयागराज महाकुंभात भाविकांची गर्दी सतत वाढत आहे. गर्दी पाहून प्रशासन सतर्क झाले आहे. वाहतूक कोंडीमुळे १२ ते १५ तासांपर्यंत भाविक एकाच ठिकाणी अडकून राहिले आहेत. यामध्ये वयोवृद्धांपासून ते महिला आणि लहान मुलांचे देखील समावेश आहे. वाहतूक कोंडीमुळे एकाच ठिकाणी अडकून राहिल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. ना अन्न ना पाणी यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.
VIDEO | Maha Kumbh 2025: Massive traffic in Prayagraj leads to chaos in public as devotees continue to arrive in large numbers to attend the Kumbh Mela.
(Full video available on PTI Videos- https://t.co/dv5TRAShcC) pic.twitter.com/NGuMUd1QNL
— Press Trust of India (@PTI_News) February 9, 2025
वाढती गर्दी पाहून प्रशासनाने प्रयागराजचे संगम स्टेशन १४ फेब्रुवारीपर्यंत बंद केले आहे. रेल्वेचे तिकिट उपलब्ध नसल्यामुळे भाविक महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी खासगी वाहनांनीही येत आहेत. त्यामुळे दिवसा आणि रात्रीच्या वेळीही शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. गर्दीमुळे लोक तासंतास वाहतूक कोंडीत अडकत आहेत. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
Discussion about this post