महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत पत्रकारितेची पदवी असलेल्यांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. यासाठी महाजेनकोने पात्र उमेदारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहे. तुम्हीही या भरतीसाठी इच्छुक असाल तर त्वरित अर्ज करावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
ही भरती ‘सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी’ या पदासाठी होणार आहे.
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पत्रकारितेत किंवा मास कम्युनिकेशन मध्ये प्रथम श्रेणीतील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठामधुन पत्रकारिता किंवा जनसंवादात प्रथम श्रेणीसह बॅचलर पदवी 02) इंग्रजी, मराठी आणि हिंदीचे ज्ञान आवश्यक आहे 03) 03 वर्षे अनुभव.
पगाराबद्दल बोलायचं झाल्यास पात्र उमेदवारांना दरमहा 45,800/- रुपये ते 1,15,905/- रुपये पगार मिळेल
अर्ज शुल्क : 944/- रुपये आहे.
वयोमर्यादा : 21 ते 38 वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : उप महाव्यवस्थापक (एचआर – आरसी ), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि. एस्त्रेला बॅटरीज विस्तार कंपाउंड , तळमजला , लेबर कॅम्प , धारावी रोड , माटुंगा – 400 019
जाहिरात पाहण्यासाठी : PDF
Discussion about this post