मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले असून मतदारसंघांची चाचपणी करताना दिसत आहेत. यातच महाविकासआघाडीचा एक अंतर्गत सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेत महाविकासाआघाडीत कोणत्या घटक पक्षाला किती जागा मिळणार याबद्दलही माहिती समोर आली आहे.
या सर्व्हेत राज्यात महाविकासआघाडीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याची माहिती आहे. या सर्व्हेनुसार या सर्व्हेनुसार काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत 85 जागांवर विजय मिळेल, असे बोललं जात आहे. तर पवार गटाला 55-60 आणि ठाकरे गटाला 32 ते 35 जागा मिळतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महायुतीत कोणाला किती जागा?
तसेच या सर्व्हेत महायुतीतील शिंद गटाला साधारण ३३ ते ३५ जागा मिळू शकतात, असे बोललं जात आहे. तर अजित पवार गटाला १८, भाजपला ५५ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासाआघाडी अशी रंगत पाहायला मिळणार आहे. यात कोण बाजी मारणार हे निवडणुकांचे निकाल लागल्यावरच स्पष्ट होणार आहे.















Discussion about this post