नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो) पुणे व नागपूर मेट्रो प्रकल्पांसाठी विविध पदे भरायची असल्याने भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज थेट टपालाद्वारे 10 ऑक्टोबरपर्यंत पाठवणे आवश्यक आहे.
महामेट्रोच्या अधिकृत पत्रकानुसार, ही नियुक्त्या पाच वर्षांच्या करारावर किंवा प्रतिनियुक्तीवर आधारित असतील. कुशल व अनुभवी व्यावसायिकांना मेट्रो प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणी व संचालनात योगदान देण्यासाठी आमंत्रित केले आहे. संबंधित क्षेत्रातील अभियंते व व्यवस्थापकांना या प्रकल्पांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.
नागपूर महामेट्रो प्रकल्पासाठी उपमहाव्यवस्थापक (जमीन मुद्रीकरण), उपमहाव्यवस्थापक (ई अँड एम) व मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (सिग्नलिंग) या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पुणे प्रकल्पासाठी उपमहाव्यवस्थापक (सुरक्षा व प्रशिक्षण) व ‘सेक्शन इंजिनीअर’ (विविध विशेषज्ञता) पदांसाठी पुणे व नागपूर प्रकल्पात अनुक्रमे 3 व 8 जागा भरल्या जाणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज व संबंधित कागदपत्रे खालील पत्त्यावर स्पीड पोस्टद्वारे पाठवावीत:
नागपूर: महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि., मेट्रो भवन, दीक्षाभूमीजवळ, नागपूर – 440001
पुणे: ए2, ए3 ब्लॉक, सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन, न्यायमूर्ती रानडे पथ, शिवाजीनगर, पुणे – 411001
पद व पगार
1 नागपूर मेट्रो
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (सिग्नलिंग) – 1 जागा – इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन बी.ई./बी.टेक., किमान 19 वर्षांचा अनुभव – 1,20,000 ते 2,80,000
महाव्यवस्थापक (जमीन मुद्रीकरण) – 1 जागा – एमबीए (वित्त), मालमत्ता विकास/महसूल क्षेत्रात 7 वर्षांचा अनुभव – 70,000 ते 2,00,000
उपमहाव्यवस्थापक (ई अँड एम) – 1 जागा – इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल बी.ई./बी.टेक., 7 वर्षांचा अनुभव – 70,000 ते 2,00,000
2 पुणे मेट्रो
उपमहाव्यवस्थापक (सुरक्षा व प्रशिक्षण) – 1 जागा – इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन बी.ई./बी.टेक., 7 वर्षांचा अनुभव – 70,000 ते 2,00,000
3 पुणे व नागपूर मेट्रो:
सेक्शन इंजिनीअर (विविध विशेषज्ञता) – प्रत्येक विशेषज्ञतेसाठी 3 ते 8 जागा – बी.ई./बी.टेक., 3 वर्षांचा अनुभव – 40,000 ते 1,25,000















Discussion about this post