भुसावळ : मध्य रेल्वेने प्रवाशांना दिलासा देणारा एक निर्णय घेतला असून वातानुकूलित आणि सामान्य डबे असलेल्या आठ गाड्यांना अतिरिक्त डब्बे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी सणवार आणि पुढच्या महिन्यापासून सुरू होत असलेल्या लग्न सराईमुळे वाढीव डब्याचा प्रवाशांना लाभ होणार आहे.
रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी वाढल्याने जनरल डब्यात पाय ठेवायलाही जागा मिळत नाही तर एसीच्या डब्यात सुध्दा जागा मिळत नसल्याने प्रवाशांचे तिकीट वेटींग वाढल्याने त्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाकडून आठ रेल्वे गाड्यांना वाढीव डबे लावण्याचा निर्णय घेतल्याने परीणामी प्रवाशांची होणारी असुविधा यामुळे दूर होणार आहे.
या गाड्यांना लागणार वाढीव डबे
22139 पुणे-अजनी हमसफर एक्सप्रेस या गाडीला शनिवार, 14 ऑक्टोबरपासून एसी थ्री 2 आणि एसी टु 2 कोच असे पाच जादा डबे जोडले जातील. 22140 अजनी-पुणे हमसफर एक्सप्रेस या गाडीला सुध्दा रविवार, 15 ऑक्टोंबरपासून अतिरीक्त तीन वातानुकूलित टू टायर कोच आणि 2 वातानुकूलित थ्री टायर डबे असतील. या गाडीला पूर्वी 15 डबे होते. आता 20 असतील. 22141 पुणे-नागपूर हमसफर एक्सप्रेस या गाडीला 13 ऑक्टोबरपासून अतिरीक्त 3 वातानुकूलित टू टायर कोच आणि दोन वातानुकूलित थ्री टायर डबे जोडण्यात येतील. या गाडीला सुध्दा आता 20 डबे असतील. नागपूर-पुणे हमसफर एक्स्प्रेस गाडीला 13 ऑक्टोंबरपासून 20 डबे असतील. 01139 नागपूर-मडगाव विशेष गाडीला शनिवार, 14 ऑक्टोंबरपासून अतिरीक्त एक वातानुकूलित थ्री टायर डबा आणि एक सामान्य डबा असेल यामुळे या गाडीला आता 22 ऐवजी 24 डबे असतील. 01140 मडगाव-नागपूर विशेष प्रवास सुरू होणार्या या गाडीला रविवार, 15 ऑक्टोंबरपासून अतिरीक्त एक वातानुकूलित थ्री टायर डबा, एक सामान्य डबा जोडण्यात येत असल्याने 24 डब्यांसह ही गाडी धावणार आहे.
Discussion about this post