नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मडगाव नगरपालिकेअंतर्गत सध्या भरती सुरु आहे. मडगाव नगरपालिकेतील या भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. १३ रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
मडगाव नगरपालिकेतील या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२४ आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
मडगाव नगरपालिकेत कनिष्ठ विभाग लिपिक, साइट सुपरवायजर, सहाय्यक गवंडी या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. कनिष्ठ विभाग लिपिक पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. साइट सुपरवायजर पदासाठी १०वी पास असणे गरजेचे आहे. तसेच सहाय्यक गवंडी पदासाठी चौथी पास उमेदवार अर्ज करु शकतात.
या नोकरीसाठी तुम्ही मडगाव नगरपालिकेत जाऊन ऑफलाइन पद्धतने अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. ()
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती
सध्या नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्येही नोकरीची उत्तम संधी आहे. एनआयसीएलमध्ये तब्बल ५०० पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. असिस्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२४ आहे.















Discussion about this post