मुंबई । लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकातून निघालेल्या गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरला आग लागल्याची घटना कल्याण आणि डोंबिवलीदरम्यान असलेल्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान घडली.
या आगीमुळे एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. या दुर्घटनेत आतापर्यंत कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 6.45 दरम्यान ठाकुर्ली स्थानकाजवळ लोकमान्य टिळक गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लाईनअरमध्ये अचानक आग लागली होती. यामुळे कल्याणकडे जाणाऱ्या गाड्यावर परिणाम पाहायला मिळाला. पण त्यानंतर आता ही गाडी कल्याण दिशेने रवाना झाली आहे.
Discussion about this post