मुंबई । १ ऑगस्ट २०२५ पासून देशभरातील व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत दिलासा मिळाल्याची बातमी आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. १९ किलो वजनाता व्यवसायिक गॅसची किंमत आजपासून ३३.५० रूपयांनी कमी करण्यात आली आहे. कमर्शियल गॅस सिलिंडर रेस्टोरेंट्स, हॉटल्स, लग्न, ढाबे या ठिकाणी वापरण्यात येतो.
दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एप्रिल २०२५ मध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रूपयांनी वाढ करण्यात आली होती, त्यानंतर अद्याप दर जैसे थे आहेत.
मागील चार महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाला. जुलै 2025 मध्ये गॅसच्या किंमतीत ३० रुपयांची कपात झाली होती. एप्रिल 2025 मध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 6 रुपयांची वाढ झाली, दिल्लीत दर 1,803 रुपये झाले. मे मध्ये 19.50 रुपयांची कपात झाली, दर 1,783.50 रुपये झाले. जून मध्ये किंमतीत कोणताही बदल झाला नाही, दर स्थिर राहिले. जुलै मध्ये 30 रुपयांची घट झाली, दर 1,753.50 रुपये झाले. आता ऑगस्टमध्ये 33.50 रूपयांनी दर कमी झाले आहेत. पाहूयात आज प्रमुख शहरात गॅसची किंमत किती झाली?
मुख्य शहरांतील नवीन व्यावसायिक एलपीजी किंमती
नवी दिल्ली: किंमत ₹1,665.00 वरून ₹1,631.50 वर घसरली
कोलकाता: ₹1,769.00 वरून ₹1,735.50 वर कमी
मुंबई: ₹1,616.50 वरून ₹1,583.00 वर उतरली
चेन्नई: ₹1,823.50 वरून ₹1,790.00 वर घसरली
Discussion about this post