मुंबई | मे महिन्याच्या सुरुवातीला सरकारी तेल कंपन्यांनी LPG गॅसचे दर अपडेट केले आहेत. त्यानुसार आज एलपीजी गॅसच्या किंमतीत कपात झाली आहे. कमर्शियल गॅसच्या किंमती १७ रुपयांनी कमी झाल्या आहेत. तर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात केली जाणार नाही.
कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात झाल्याने आज १ मे रोजी मुंबईत गॅस सिलिंडरची किंमत १६९९ रुपये झाली आहे. ही किंमत १७१३.५० रुपये होती. त्यामुळे व्यवसायिकांना, हॉटेलमालकांना याचा फायदा होणार आहे.
कोलकत्त्यात कमर्शियल सिलिंडर १८६८ रुपयांवरुन १८५१.५० रुपये झाली आहे. चेन्नईत गॅस सिलिंडरची किंमत १९०६.५० रुपये झाली आहे. ही किंमत १९२१.५० रुपये होती.
घरगुती गॅस सिलिंडरवर कोणताही परिणाम नाही
मात्र घरगुती गॅस सिलिंडरवर कोणताही परिणाम होणार नाही. घरगुती गॅस सिलिंडरची किंमत मुंबईत ८५२.२० रुपये झाली आहे. घरगुती LPG गॅसचे दर 8 एप्रिल रोजी अपडेट करण्यात आले. त्यावेळी सरकारने, जवळपास एक वर्षानंतर, 14 किलो एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ केली होती. LPG Price |
तर आज 19 किलो वजनाचे गॅस सिलिंडरचे दर कमी झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. सर्वसामान्य नागरिाकांवर याचा परिणाम होणार नाही. परंतु व्यावसायिक, हॉटेलमालक जे लोक जास्त प्रमाणात गॅस सिलिंडरचा वापर करतात त्यांच्या परिणाम होणार असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे. LPG Price |
Discussion about this post