मुंबई : ऑगस्टचा पहिला दिवस दरवाढीचा ठरला. कारण ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठे बदल झाले आहेत. त्याचा परिणाम थेट ग्राहकांवर होणार आहे. सरकारी तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी आजपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल केला आहे.
या बदलानंतर 1 ऑगस्टपासून 19 किलोचे व्यावसायिक एलपीजी सिलिंडर महाग झाले आहेत. घरगुती वापरासाठी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे.
देशातील विविध शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सुमारे 8 ते 9 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ कर्मशियल एलपीजी सिलिंडरसाठी करण्यात आली आहे. यावेळीही घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दिल्लीमध्ये 19 किलो गॅस सिलिंडरची किंमत 6.50 रुपयांनी वाढली आहे. नवे दर 1652.50 रुपयांवर पोहोचले आहेत. कोलकाता इथे आज 1764.50 रुपये सिलिंडरची किंमत आहे. तर मुंबईत 1605 आणि कोलकाता इथे 1817 रुपये गॅस सिलिंडरची बदलेली किंमत आहे. यापूर्वी चार महिने कर्मशियल एलपीजी सिलिंडरच्या किंमतींत घसरण झाली होती. आता पुन्हा एकदा जुलै महिन्यापासून वाढ करण्यात आली आहे.