जळगाव । लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला बहुमत मिळालं असलं तरी राज्यात महायुतीला मोठा फटका बसला आहे. याबाबत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली भूमिका मांडली.लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. विशेषतः शिंदे गटाला मोठा फटका बसला आहे. यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी लोकसभा निकाल काहीही लागले तरी त्याचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही. विधानसभा निवडणुकीत लोकांची असलेल्या संपर्क आणि केलेली विकास कामे यावरच मतदान होते, असे ते म्हणाले.
महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र केंद्रात एनडीएचेच सरकार स्थापन होत आहे. याचा आम्हाला आनंद आहे. लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्या. काही ठिकाणी पराभव त्यावर चर्चा सुरू आहे. या पराभवाची कारणे आम्ही शोधू आणि पुढील निवडणुकांना तयारीनिशी सामोरे जाऊ, असे मंत्री पाटील म्हणाले.
महायुतीच्या जागा वाटपात प्रदीर्घकाळ चर्चा सुरू होती. या चर्चेमुळे बऱ्याच कालापव्यय झाला. उमेदवार जाहीर करण्यास देखील विलंब झाला. यासंदर्भात भाजप नेते गिरीश महाजन यांनी जागांची अदलाबदल करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र आता ते सर्व जुने झाले आहे. त्यामुळे जर तर ला काहीही अर्थ नाही. हत्ती निघून गेला आता शेपटीला काय बघायचं, असे सूचक विधान त्यांनी केले.















Discussion about this post