पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीत ४००चा टप्पा पार पडणार असे सांगितले जात होते. मात्र आज लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून दुपारपर्यंतच्या कल पाहता एनडीएला ३०० पर्यंतही जागांवर आघाडी घेता आली नाहीय. इंडिया आघाडीने एनडीएचा रथ रोखल्याचं या कलांमधून स्पष्ट झालं आहे. एनडीएसाठी हा अनपेक्षित धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.
कलानुसार भाजपच्या नेतृत्वातील एनडीए 291 जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडी 233 जागांवर आघाडीवर आहे. इंडिया आघाडीने अपक्षेपेक्षा मोठी उसळी घेतल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. या कलानुसार इंडिया आघाडीची कामगिरी अत्यंत चांगली झालेली दिसत आहे. तर भाजपची कामगिरी सुमार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट ओसरल्याचंही या कलांमधून स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे ज्या पाच राज्यांवर भाजपची मदार होती, त्याच बालेकिल्ल्यात भाजपला मोठा सुरुंग बसला आहे.
भाजपला उत्तर प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि हरियाणात मोठा फटका बसला आहे. उत्तर प्रदेशातील 80 जागांपैकी केवळ 35 जागांवर भाजपला विजय मिळताना दिसत आहे. तर समाजवादी पार्टी 34 आणि काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात राम मंदिर उभारल्यानंतर मोदी सरकारला मोठा फायदा होईल असं चित्र होतं. पण भाजपचा हा बालेकिल्लाच ढासळला आहे. त्यामुळे भाजपसाठी ही मोठी धोक्याची घंटी असल्याचं सांगितलं जात आहे.
सोयाबीन, शेतकऱ्यांचा प्रश्न भोवला
हरियाणात भाजपला अवघ्या चार जागा मिळताना दिसत आहे. तर काँग्रेसला 6 जागा मिळताना दिसत आहेत. हरियाणा हा सुद्धा भाजपचा बालेकिल्ला आहे. मात्र, पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचं आंदोलन आणि सोयबीनच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणं भाजपला भोवल्याचं दिसून येत आहे. भाजपच्या या निगरगट्ट भूमिकेमुळेच भाजपचा पारंपारिक मतदार हा काँग्रेसकडे गेल्याचं सांगितलं जात आहे. पंजाबमध्ये तर भाजपला खातंही उघडता येणार नसल्याचं चित्र आहे.















Discussion about this post