मुंबई । आज लोकसभा निवडणूक 2024च्या मतमोजणीला सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली असून अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, यात जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.
यावेळी जळगावमधून भारतीय जनता पक्षाने जळगावातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकिट कापून माजी आमदार स्मिताताई उदय वाघ यांना तिकिट दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तर दुसरीकडे उन्मेष पाटील यांनी थेट समर्थकांसह शिवसेना-उबाठा पक्षात प्रवेश केला. तर त्यांच्या सोबत आलेले पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण बाळासाहेब पवार यांना पक्षाने जळगावातून उमेदवारी दिली.
रावेरमधून मात्र लागोपाठ तिसर्यांदा विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांच्यावर विश्वास टाकण्यात आला. तर रावेरमधून जानेवारी महिन्यात भाजपमध्ये आलेले उद्योजक श्रीराम दयाराम पाटील यांनी शरद पवार गटात एंट्री केल्यावर त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर, वंचित बहुजन आघाडीने रावेरमधून अभियंता संजय पंडित ब्राह्मणे यांना उमेदवारी जाहीर करून रिंगणात उतरवल्याने येथील मुकाबला हा तिरंगी आणि अर्थातच अधिक चुरशीचा बनला.
लाईव्ह अपडेट
जळगाव लोकसभा मतदारसंघ :
पहिली
करन -14477
स्मिता – 29702
रावेर लोकसभा मतदारसंघ
पहिली फेरी
रक्षा भाजप -21790
श्रीराम -14219















Discussion about this post