जळगाव । लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 11 मतदार संघात मतदान सुरु आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, रावेर, शिर्डी, अहमदनगर दक्षिण, पुणे, शिरूर, मावळ, बीड , जालना, छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदार संघात मतदान सुरु आहे.
दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील तीन मतदारसंघात आज मतदान पार पडतंय. यात जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण पवार लोकसभेच्या रिंगणात आहेत. तर, रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रक्षा खडसे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीराम पाटील लोकसभेच्या रिंगणात आहेत.
दरम्यान, 7 ते 11 पर्यंतचे जळगाव लोकसभा मतदारसंघात 16.89 % इतके मतदान झाले. तर रावेर लोकसभा मतदारसंघात 19.03 % इतके मतदान झाले.
Discussion about this post