मुंबई । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार कामाला लागली आहे. अनेक पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी देखील सुरु झालीय. यातच भाजपच्या वतीने लोकसभेसाठी महाराष्ट्रातून मिशन 45 साठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्र भाजपमधील अनेक मोठ्या चेहऱ्यांना लोकसभेचे तिकीट दिजाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्यासाठी राज्यातील दिग्गज नेते आशिष शेलार, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. विजय होण्याची क्षमता या एकाच निकषावर राज्यातील नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाणार आहे.
महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघांत केंद्रीय मंत्री भेटी देत असून त्यामाध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद सुरू आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील 16 मतदारसंघ निवडले आहेत. त्यापैकी दहा मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य आहे.
दरम्यान, भाजपमधील विद्यमान खासदारांचा या वेळी पत्ता कट होणार आहे. पक्ष संघटनेत त्यांना इतर जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यांच्या जागी काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. यात मुखत्वे मुंबईतील जागांचा समावेश आहे. भाजपच्या खासदारांच्या जागी काही नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरू आहे. महाराष्ट्रातील काही खासदारांच्या कामगिरीवर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे मुंबईतही काही जागांवर बदल होणार शक्यता आहे.















Discussion about this post