नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखांबाबत मोठी अपडेट समोर आली असून निवडणूक आयोग लवकरच सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करू शकते.निवडणूक जाहीर होण्याआधीच राजकीय पक्षांनी आधीच तयारी सुरू केली आहे.
निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाचे (ECI) अधिकारी देशातील अनेक राज्यांना भेटी देत आहेत. दरम्यान, 13 मार्चनंतर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात, अशी बातमी समोर येत आहे. 7-8 टप्प्यात मतदान होऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, निवडणूक आयोग 13 मार्चनंतर लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करू शकते. देशातील निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे पथक राज्यांच्या दौऱ्यावर आहे. तसेच कोणत्या राज्यात किती टप्प्यात आणि कशा पद्धतीने निवडणूक प्रक्रियाचे नियोजन करता येईल, याचा आढावाही त्यांच्याकडून घेतला जात आहे.
Discussion about this post