2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात राजकीय गोंधळाचा काळ आहे. राजकीय पक्ष जागावाटप आणि उमेदवारांची नावे जाहीर करण्यात व्यस्त आहेत. याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. भाजपने दुसऱ्या यादीत 72 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
नंदुरबारमधून हिना गावित यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. हिना गावित या सध्या तिथल्या खासदार आहेत. त्या गेल्या 10 वर्षांपासून नंदुरबारच्या खासदार आहेत. त्यामुळे त्यांना यावेळी विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी पक्षाने दिली आहे.
धुळे मतगारसंघातून सुभाष भामेर यांमा उमेदवारी जाहीर झाली आहे. सुभाष भामरे यांच्या उमेदवारीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरु होती. त्यांचं तिकीट कापलं जाईल, अशी चर्चा सुरु होती. पण पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा संधी दिली आहे.
Discussion about this post