नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्या लोकसभेत अर्थसंकल्पीय भाषण वाचत आहेत. या अर्थसंकल्पात युवकांना रोजगार मिळाल्यासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात पंतप्रधान मुद्रा योजनेची कर्ज मर्यादा वाढविण्यात आली आहे. मुद्रा योजनेंतर्गत आता तरुणांना 20 लाखापर्यंतचे कर्ज मिळणार आहे. काय ही योजना पाहूयात….
पंतप्रधान मुद्रा योजनेतील कर्ज मर्यादा देखील 20 लाखापर्यंत वाढविण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. या मुद्रा योजनेतर्गत आधी 10 लाख रूपयांपर्यंतचे कर्ज दिले जात होते. आता त्यात शंभर टक्के वाढ करण्यात आली आहे. काय आहे ही पंतप्रधान मुद्रा योजना पाहूयात.
पंतप्रधान मुद्रा योजना ( PMMY ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 एप्रिल 2015 रोजी सुरु केली होती. या योजनेंतर्गत बिगर कॉर्पोरेट, बिगर शेती लघु सुक्ष्म उद्योगांना 10 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. या योजनेत या कर्जाला मुद्रा योजना असे नाव दिले आहे. कोणत्याही भारतीय नागरिकाला ज्याच्याकडे उत्पादन प्रक्रिया व्यापार किंवा सेवा क्षेत्रासारख्या बिगर शेती उत्पन्न देणारा उद्योग आहे त्यांना आता 20 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. मुद्रा कर्जासाठी बँक, MFI वा एनबीएफसी या संस्थांशी संपर्क साधता येतो.
Discussion about this post