नवी दिल्ली । पतंजली आयुर्वेदाच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. दोन वर्षांपासून प्रलंबित असलेले काम उत्तराखंड सरकारने दोन दिवसांत पूर्ण केले आहे. उत्तराखंड औषध नियंत्रण विभागाच्या परवाना प्राधिकरणाने पतंजलीच्या उपकंपनी दिव्या फार्मसीला मोठा धक्का दिला असून या कंपनीच्या 14 उत्पादनांवर बंदी घातली आहे.
दिव्या फार्मसीच्या या औषधांवर दिशाभूल करणाऱ्या जाहिराती औषध आणि जादू उपचार कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. उत्तराखंड सरकारनेही या कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाला माहिती दिली असून प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
या 14 उत्पादनांवर बंदी
उत्तराखंड औषधी विभागाने पतंजलीच्या 14 उत्पादनांचा परवाना रद्द केला आहे. त्यामध्ये स्वासारी गोल्ड, स्वासारी वटी, ब्रोंकोम, स्वासारी प्रवाही, स्वासारी अवलेह, मुक्त वटी एक्स्ट्रा पॉवर, लिपिडोम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पॉवर, लिवमृत ॲडव्हान्स, लिवोग्रिट, आईग्रिट गोल्ड, पतंजली दृष्टी आय ड्रॉप या औषधांचा समावेश आहे.
बाजारात मिळतील ही उत्पादनं
आता ही उत्पादनं बाजारात मिळणार नाही. पतंजली त्यांचे उत्पादन करु शकणार नाही आणि ही उत्पादनं विक्री पण करु शकणार नाही. या उत्पादनावर बंदी आल्याने ही उत्पादनं बाजारातून हटविण्यात आली आहे.
कारण तरी काय?
उत्तराखंड सरकारच्या औषधी विभागाने ही 14 उत्पादनं बंद करण्याचे आदेश दिले होते. अनेक ठिकाणाहून या उत्पादनाविषयी तक्रारी येत होत्या. उत्पादन खपविण्यासाठी भ्रामक, दिशाभूल करणारी जाहिरात करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत होता. या तक्रारीनंतर केंद्रीय आयुष मंत्रालयाने कारवाईचे निर्देश दिले. या उत्पादनाविषयी नोटीस देऊन सुद्धा ती तयार करण्यात येत होती. त्यामुळे औषधे आणि जादूचे उपाय कायदा 1954, औषधे आणि सौंदर्यप्रसाधनं कायदा 1945 चे वारंवार उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आली.















Discussion about this post