एलआयसीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. भारतीय जीवन विमा निगममध्ये हाउसिंग फायनान्समध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी कोणताही पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतो. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार २२ सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज करू शकणार आहे. अधिकृत वेबसाइट lichousing.com ला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेत एकूण १९२ पदे भरली जाणार आहे.
पात्रता
या भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा स्ट्रीममधून ग्रॅज्युएशन केलेले असावे. याचसोबत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी याआधी अप्रेंटिसशिप केलेली नसावी. २० ते २५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ९४४ रुपये शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ४७२ रुपये शुल्क भरायचे आहे.या नोकरीसाठी अर्ज करताना शुल्कदेखील ऑनलाइन भरायचे आहे.
अर्जप्रक्रिया
या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला NATS पोर्टल nats.education.gov.in.in वर जाऊन रजिस्टर करायचे आहे. त्यानंतर दिलेल्या पोर्टलवरुन अर्जप्रक्रिया पूर्ण करायचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ट्रेनिंगसाठी जिल्हा प्रेफरन्स ही माहिती भरायची आहे. या नोकरीसाठी अर्ज कसा करायचा याबाबत सर्व माहिती दिली आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड प्रवेश परीक्षेद्वारे होणार आहे. ही परीक्षा १ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे.या नोकरीसाठी तुम्हाला कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. यानंतर मुलाखत होणार आहे. या नोकरीसाठी भरती ८ ते १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.















Discussion about this post