सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळात (LIC) मोठी पदभरती निघाली आहे. विशेष या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार एलआयसीच्या (LIC) अधिकृत वेबसाइट licindia.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
एलआयसीने सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) आणि सहाय्यक अभियंता (AE) या एकूण ८४१ पदांसाठी ही भरती जाहीर केली. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ८ सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीसंबंधी पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर महत्त्वाचे तपशील खालीलप्रमाणे आहेत.
सरकारी क्षेत्रात स्थिर करिअरच्या शोधात असलेल्या पदवीधर आणि अभियंत्यांसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी आणि शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असा सल्ला दिला जात आहे. अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी एलआयसी इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
पदांचा तपशील
या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ८४१ पदांवर नियुक्ती केली जाणार आहे, यामध्ये
सहाय्यक अभियंता (Assistant Engineers): ८१ पदे
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO – स्पेशलिस्ट): ४१० पदे
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO – जनरलिस्ट): ३५० पदे
पात्रता निकष आणि अर्ज शुल्क
पात्रता
वरील नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेची सविस्तर माहिती अधिकृत अधिसूचनेमध्ये काळजीपूर्वक वाचावी. प्रत्येक पदासाठी आवश्यक असलेली पात्रता वेगवेगळी असू शकते.
अर्ज शुल्क
SC/ST/PwBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ८५ रु./- + व्यवहार शुल्क (Transaction Charges) + GST असेल.
इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ७०० रु./- + व्यवहार शुल्क (Transaction Charges) + GST असेल.















Discussion about this post