ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या तरुणांना सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. सरकारी विमा कंपनी एलआयसीमध्ये सध्या अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एलआयसीच्या हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये ही भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.
एकूण २५० रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जून २०२५ आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. तुम्ही अर्जाचा फॉर्म NATSच्या पोर्टलवर nats.education.gov.in जाऊन लिंकवरुन अर्ज करु शकतात.
एलआयसी एचएफएल अप्रेंटिस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. कोणत्याही विषयात ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी २० ते २५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ९४४ रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्कात सूट देण्यात आली आहे.
या नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर उमेदवारांना प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. ही परीक्षा ३ जुलै २०२५ रोजी होणार आहे. या परीक्षेत पास झाल्यानंतर कागदपत्रे पडताळणी आणि इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. या अप्रेंटिसशिपसाठी निवड झाल्यावर तुम्हाला १२ महिने काम करावे लागणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
Discussion about this post