सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडने भरती जाहीर केली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. कनिष्ट सहाय्यक पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. तब्बल २०० रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे.
या नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया २५ जुलैपासून सुरु झाली आहे. १४ ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.
भरतीसाठी पात्रता काय?
अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६० टक्के गुणांसह पदवी प्राप्त केलेली असणे गरजेचे आहे. उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनीच या नोकरीसाठी अर्ज करावा.
वयश्रेणी : या नोकरीसाठी वयोमर्यादा २१ ते २८ वर्षे आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. हे दोन टप्पे पार केल्यानंतरच उमेदवारांची निवड केली जाईल.
अर्ज शुल्क : या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ८०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. यासाठी lichousing.com या वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
वेतनश्रेणी : या नोकरीसाठी ज्या शहरात पोस्टिंग केली जाईल. त्यानुसार वेतन देण्यात येईल. ३२ हजार ते ३५ हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन दिले जाईल.
Notification : PDF















Discussion about this post