धुळे | तुम्ही जर तुमच्या चिमुकल्यांना बिस्किट खाऊ घालत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. धुळेतील नामांकित मॉलमधून विकत घेतलेल्या बिस्किटाच्या पॅकेटमध्ये बुरशी आणि आळ्या सापडल्या. ग्राहक अनिकेत बिरारी यांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून पालकवर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्यात नामांकित मॉल मधून अनिकेत बिरारी असे या ग्राहकाने बिस्कीट विकत घेतलं. अनिकेत बिरारी यांनी घरी गेल्यानंतर तो बिस्किट उघडलं. त्यानंतर त्या बिस्किटाला बुरशी लागल्याचे आणि आळ्या असल्याचे लक्षात आले. त्यांनी या संदर्भात धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे व अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार केली आहे.
या तक्रारीनंतर ग्राहकांमध्ये आरोग्य सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या बिस्किटांमुळे मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. या संदर्भात आता प्रशासन पुढील काय कारवाई करेल हे बघणं आवश्यक ठरणार आहे. दरम्यान या घटनेने प्रशासनाला आणि पालकवर्गाला सतर्क केले आहे.
परंतु तुम्ही जर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना बिस्किट खायला देत असाल तर आपण देखील त्या बिस्किटात आळया तर नाहीत ना याची खात्री करा आणि मगच आपल्या मुलांना ते बिस्किट खायला द्या.ग्राहकांनी वस्तू घेण्याआधी खात्री बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post