धुळे । शालेय पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेत दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये चक्क जिवंत अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार धुळ्यातील साक्री तालुक्यातील भोनगाव येथील जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे शासनाचा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे.
शालेय विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन योजना अर्थात शालेय पोषण आहार दिला जात असतो. यात आता धान्य देण्याऐवजी शाळेतच अन्न शिजवून दुपारच्या वेळी विद्यार्थ्यांना दिले जाते. प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळेत हि योजना प्रकर्षाने राबविली जात आहे. यामुळे गरीब घरातील मुलांना शाळेतच जेवण मिळत असते. यासोबत आता चॉकलेट देखील दिले जात आहेत. मात्र या चॉकलेटमध्ये अळ्या असल्याचा धक्कादायक प्रकार भोनगाव येथील जिल्हा परिषद शाळेत घडला आहे.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या चॉकलेटवर छापण्यात आलेली एक्सपायरी डेट अद्याप संपलेली नाही. अर्थात मुदतीत असलेल्या या चॉकलेटमध्ये आल्या आढळून आल्याने पुरवठा करण्यात आलेल्या मालाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Discussion about this post