रावेर । ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाणात मोठ्या प्रमाणत वाढले आहे. याच दरम्यान, आता मुख्याध्यापकाच्या खात्याकडून दोन लाख ७९ हजार १५२ रुपये ऑनलाइन काढून फसवणूक केल्याची घटना समोर आली असून याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील उर्दू शाळेचे मुख्याध्यापक नाझीमुद्दीन आझीमुद्दीन यांना इन्कम टॅक्स रिटर्नचे चार हजार रुपये युनियन बँकेतून कॅनरा बँकेत टाकायचे होते. याबाबत अज्ञात व्यक्तीने ऋतिक यादव असे नाव सांगून संपर्क करून त्यांचा एटीएम नंबर, बँक खाते या संदर्भात कागदपत्रे व माहिती घेऊन तसेच बँकेचे कोड नंबर मागवून त्यांना एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.
त्यांच्या खात्यातून दोन लाख ७९ हजार १५२ रुपये ऑनलाइन परस्पर काढले. या बाबतचा मेसेज मुख्याध्यापक यांना आल्याने त्यांच्या लक्षात ही घटना आली. याबाबत निंभोरा पोलिस ठाण्यात मुख्याध्यापकांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे. रावेर व निंभोरा पोलिस तपास करीत आहेत.
Discussion about this post