जळगाव । सरकारी सेवेत असूनही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांचा शोध महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. यात पाहिल्यात टप्प्यात राज्यातील १ हजार १८३ जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या महिलांसह १७ पुरुष कर्मचाऱ्यांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती उघडकीस आली आहे.
त्यामध्ये जळगाव जिल्हा परिषदमधील ७ महिला कर्मचाऱ्यांसह आणि मुक्ताईनगर तालुक्यातील एका पुरूष ग्रामसेवकाचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. या योजनेच्या लाभ घेतलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आता महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत कार्यवाही करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये त्यामुळे या योजनेवरून गदारोळ निर्माण झाला आहे.
जिल्हानिहाय कर्मचारी
बुलढाणा जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक १९३ कर्मचाऱ्यांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला आहे. तर सोलापूरमध्ये १५०, लातूर १४७, बीड १४५, धाराशिव ११०, जालना ७६ आणि वाशीम जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या ५४, कोल्हापूर २४, सांगली आणि अहिल्यानगर प्रत्येकी १७, नागपूर ११, अमरावती १० आणि छत्रपती संभाजीनगर व नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी ९ महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
तर सातारा, नांदेड, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी ८, जळगाव, गोंदिया प्रत्येकी ७, चंद्रपूर, धुळे भंडारा प्रत्येकी ५, परभणी ३ आणि गडचिरोली, यवतमाळ, ठाणे, हिंगोली प्रत्येकी २ व अकोला, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबई, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी १ महिला कर्मचाऱ्याने लाडकी बहिण योजनेत हात धुवून घेतले आहेत.















Discussion about this post