मुंबई । लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता जवळपास २७ लाख महिलांच्या घरोघरी अंगणवाडी सेविका जाऊन पडताळणी करणार आहे. यासाठीची प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. या योजनेत ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतले आहेत त्यांची पडताळणी केली जाणार आहे. त्यात जर महिला अपात्र ठरल्या तर त्यांचा लाभ बंद होणार आहे.
लाडकी बहीण योजनेत २६ लाख ३४ हजार महिला अपात्र ठरल्याची माहिती माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिली आहे. आता या सर्वांच्या याद्यांमधील महिलांची घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यास या याद्या पाठवून अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरु केली जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेत २ कोटी ५९ लाख महिलांनी अर्ज केले होते. त्यासाठी निधीदेखील वर्ग करण्यात आला. विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी सुरु केली. त्यातूनही अनेक महिला बाद झाल्या. परंतु आता पुन्हा २६ लाख ४४ हजार महिला अपात्र असल्याची माहिती आदिती तटकरेंनी दिली. त्यानंतर आता अंगणवाडी सेविका या महिलांच्या घरी जाऊन पडताळणी करणार आहे.
Discussion about this post