मुंबई । राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विविध मुद्द्यांवरुन विरोधक आक्रमक झाले. यादरम्यान सभागृहात लाडकी बहिण योजनेवरुन गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेत फटका बसला म्हणून लाडकी योजना आणली असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. तसेच 2100 रुपये कधी देणार याची तारीख अजून दिलेली नाही, असा सवालही सतेज पाटील यांनी उपस्थित केला. दरम्यान आमदार सतेज पाटील यांच्या प्रश्नांना मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर देताना सांगितलं की, लाडकी बहीण योजना ही सगळ्यात महतवकांशी योजना असून नअडीच कोटी महिलांना फेब्रुवारी, मार्चचा हफ्ता मिळणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
तसेच पुढे आदिती तटकरे म्हणाल्या की, “जुलै महिन्यात आम्ही रजिस्ट्रेशन सुरू केलं. 2 कोटी महिल्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे. आम्ही ऑगस्ट महिन्यात छाननी करायाला सुरूवात केली. आता संजय गांधी योजनांची डेटा आम्हाला नंतर प्राप्त झाला. आम्ही त्यानंतर कारवाई करत गेलो. त्यानंतर आचारसंहिता होती तेव्हा काम बंद करण्यात आले. लाडक्या बहीणीचा GR काढला तेव्हा आम्ही बदल केला नाही”.
“जशा तक्रारी आल्या तेव्हा आम्ही कारवाई करत गेलो. ही योजना 21 ते 65 व्योगताल्या महिल्यांनसाठी आहे. जवळपास 1.5 कोटी हा समान निधी पोहचवत आहोत. आम्ही 2100 घोषीत करू अस आपण जाहीर केलं नव्हते आणि हा अर्थसकल्पेत ही जाहीर केला नव्हता. जेव्हा हा प्रस्ताव होईल तेव्हा आम्ही जाहीर करू”, असं आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.
Discussion about this post