मुंबई । माझी लाडकी बहीन योजनेला महिलांकडून उत्स्फुर्त पाठिंबा मिळत. या योजनेच्या माध्ममातून सरकारने प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा १५०० जमा करण्याचे आश्वासन दिले होते. ज्या महिलांना अर्ज केले नसतील त्यांना देखील अर्ज करण्याची अजूनही संधी आहे. अर्ज केलेल्या अनेक महिलांच्या खात्यात गेल्या महिन्यात ३००० रुपये जमा करण्यात आले. परंतु काही अशा महिला आहेत ज्यांना थेट ४५०० रुपयांचा लाभ मिळू शकतो.
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही योजना महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या २१ वर्षांवरील ते ६५ वर्यापर्यंतच्या सर्व महिलांना मिळणार आहे. माझी लाडकी बहीन योजनेसाठी अर्ज केल्यानंतर, या योजनेच्या माध्यमातून सर्व पात्र महिलांना १५०० रुपये दरमहा मिळणार आहेत. हे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. माझी लाडकी बहिन योजनेसाठी याआधी अॅप आणि ऑनलाईन अर्ज करता येत होते. पंरतू आता सरकारने ही सेवा बंद केली आहे. त्याऐवजी अंगनवाडी सेविकांकडे ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे.
माझी लाडकी बहीण योजनेला 28 जून 2024 रोजी मंजुरी मिळाली होती, त्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली. आधी या योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख 31 जुलै होती. परंतु नंतर वाढता प्रतिसाद पाहता सरकारने मुदत वाढवली होती. ती आता 31 सप्टेंबर करण्यात आली आहे. ज्या बहिणींना आजपर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकले नसतील तर अशा महिलांना अजूनही अर्ज करण्याची मोठी संधी आहे. कारण तुम्हाला तर आधीचे दोन हप्ते मिळाले नसतील तर तुम्हाला थेट 4500 रुपये मिळणार आहेत.
लाडकी बहीण योजनेसाठी कोण करु शकतात अर्ज
माझी लाडकी बहीण योजनेसाठी सर्व महिला ज्यांचे वय 21 ते 65 वर्षे आहेत . त्या या सोजनेसाठी अर्ज करु शकतात.
एका कुटुंबातील एकच अविवाहित बहीण अर्ज करू शकते.
विवाहित बहिणी, घटस्फोटित, विधवा महिला देखील योजनेसाठी अर्ज करू शकतात.
सर्व बहिणींचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
माझी लाडकी बहिन योजनेचे फायदे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केल्यानंतर सर्व भगिनींना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. त्यासोबतच दरवर्षी ३ एलपीजी गॅस सिलिंडर देखील मोफत दिले जाणार आहेत.















Discussion about this post