मुंबई । राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण दोन टप्प्यांत पात्र महिलांना ३००० रुपये रक्कम मिळाली आहे. दरम्यान, आता तिसऱ्या टप्प्यातील वाटप कधी होणार? याची राज्यभरातील लाडक्या बहिणी वाट पाहात आहेत. असे असतानाच आता राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
येत्या 29 सप्टेंबर रोजी महिलाना लाडक्या बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दि. २९ सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.आज मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.
दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात आढावा घेण्यात आला.व्यासपीठाचे व्यवस्थापन, कायदा व सुरक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यक्रमस्थळी पार्किंगची व्यवस्था, पिण्याचे पाणी, लाभार्थ्यांची यशोगाथा याबाबतच्या महत्वाच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.
Discussion about this post