जळगाव : लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून माणसांची हवा आता कमी झाली आहे आणि महिलांची हवा वाढलीय. 50 टक्के महिलांनी जरी मतदान केलं तर आपला कार्यक्रम झालाच, ही विरोधकांना भीती आहे. तसेच महिलाही हुशार आहेत, माणसांनी सांगितलं तर हो म्हणतील, पण जो भाऊ पंधराशे देतो, त्याचंच बटन दाबतील, असा मिश्किल टोला शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी लागवला आहे.
घरात माणसांनी सांगितलं तरी, जो भाऊ पंधराशे देतो त्याचेच महिला बटन दाबतील, असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. लाडकी बहीण योजना बंद व्हावी म्हणून काँग्रेस कोर्टात गेली, मात्र मुळात माणसांची हवा आता कमी झाली असून महिलांची हवा वाढल्याचेही ते म्हणाले, जर 50% जरी महिलांनी मतदान केलं तरी आपला कार्यक्रम झाला ही विरोधकांना भीती आहे. म्हणून ते खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत असल्याचेही ते म्हणाले. जळगावमध्ये आयोजित भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी गुलाबराव पाटलांनी हे वक्तव्य केल आहे.
राज्यात आत्तापर्यंत 2 कोटी 30 लाख बहिणींच्या खात्यात पाच हप्ते जमा झाले आहेत. जवळपास 17000 कोटी रुपयांचे वितरण सरकारनं लाडक्या बहिणींना केलं आहे.