मुंबई । महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’योजने सुरु केली असून योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयाचा लाभ मिळत आहे. या योजनेत डिसेंबरचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देण्यात आला होता. त्यानंतर जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.
मात्र, आता जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याची तारीख ठरली आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता २६ जानेवारी २०२५ रोजी जमा होणार आहे, असं आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे. २६ जानेवारीच्या आधीपासूनच आम्ही लाडक्या बहिणींना हप्ता देणार आहोत.
या महिन्यात १५०० रुपये मिळणार आहेत.आम्ही आमच्या घोषणा पत्रात दिलेल्या सर्व योजना लोकांना देत आहोत. आता आम्ही फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची तयारी करत आहोत, असं आदिती तटकरेंनी सांगितले आहे.
Discussion about this post