जळगाव । लाडकी बहीण योजनाचा डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच वर्ग केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. त्यानुसार लाडक्या बहिणींच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. खात्यावर १५०० रुपये जमा झाल्याचा मेसेज लाडक्या बहिणींना आला आहे. जळगाव जिल्ह्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा झाले असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास बंद झाले होते. त्यासाठी राज्य सरकारने आचारसंहितेपूर्वीच नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे लाडक्या बहिणींना आगाऊ दिले होते. त्यानंतर विधानसभा निवडणूक संपून महायुती सरकार सत्तेत आल्यावर आता डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार याकडे सगळ्या लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं होतं. आता मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जळगाव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले असल्याचा मेसेज आल्याने महिला आनंदी आहेत. हे डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे आहेत.















Discussion about this post