मुंबई । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु होऊन वर्ष झाले आहे. या योजनेचे आतापर्यंत १२हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. आता लाडक्या बहिणींना १३वा हप्ता दिला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या हप्त्याची वाट महिला पाहत आहेत. महिला संपला तरीही अजून याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. अशातच जुलैच्या हप्त्याबबात एक मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या हप्त्यासाठी निधी वर्ग करण्यात आला आहे.
राज्याच्या महिला व बालविकास भागाने लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2984 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे.यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणत्याहीक्षणी जमा होऊ शकतो.
जुलैच्या हप्त्यासाठी निधी वर्ग केला असला तरीही आता ऑगस्टच्या हप्त्याचीही चर्चा सुरु झाली आहे. ऑगस्ट महिना सुरु झाला आहे त्यामुळे जुलै अन् ऑगस्टचे पैसे एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, रक्षाबंधनच्या दिवशी जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रितपणे जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित रक्षाबंधनला महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होऊ शकतात.
26.34 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता थांबवला
माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे. या माहितीच्या आधारे जून 2025 पासून या 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे.
Discussion about this post