मुंबई । राज्यातील लाखो महिलांना प्रतीक्षा असलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या फेब्रुवारी हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मार्च महिना संपत आला असतानाही हप्ता जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता राज्य सरकारने निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याने लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने या योजनेसाठी २७७ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यास मंजुरी दिली आहे. हा निधी महिला व बाल विकास विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत हस्तांतरित करण्यात येणार असून, त्यानंतर थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचा फेब्रुवारी हप्ता जमा केला जाणार आहे.
दरम्यान, अनेक महिलांच्या मनात फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी सध्या फेब्रुवारीचा हप्ता प्राधान्याने वितरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या आणि केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण केलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या लाभार्थींच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत, त्यांनी ३१ मार्चपर्यंत आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी, अन्यथा त्यांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे दीर्घकाळापासून हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांना लवकरच दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post