राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना राबविली जात असून या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट खात्यात पाठविले जात आहे. मात्र लाडकी बहीण योजनेमध्ये मागच्या काही दिवसात अनेक गैरप्रकार आढळले होते. हे गैरप्रकार थांबवण्यासाठी आता राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आता ई-केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे परिपत्रक महिला आणि बालविकास विभागाने जारी केले आहे.
ई-केवायसी प्रक्रिया कशी करायची?
ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहे. त्यांनी https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ई-केवायसी करायची.
या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला काही महत्वाची कागदपत्रे आणि माहिती पुन्हा आपलोड करावी लागणार आहे.
यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, रेशन कार्ड क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्ड संदर्भात सर्व माहिती टाकावी लागणार आहे.















Discussion about this post