मुंबई । एकीकडे राज्यात २९ महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून त्यापूर्वी राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ चे दोन्ही हप्ते एकत्रित म्हणजे ३,००० रुपये मकर संक्रांती (१४ जानेवारी २०२६) पूर्वी महिलांच्या खात्यात जमा करणार असल्याची माहिती समोर आलीय. मात्र, या घोषणेवर काँग्रेस पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे.
काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवून, मतदानाच्या आदल्या दिवशी (१४ जानेवारी) हप्ता जमा झाल्यास महिलांवर प्रभाव पडू शकतो आणि आचारसंहितेचा भंग होऊ शकतो, असा युक्तिवाद केला आहे. त्यामुळे निवडणूक संपल्यानंतरच हप्ता द्यावा, अशी मागणी केली आहे.
वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचे आदेश
काँग्रेसच्या दाव्याची दखल राज्य निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. काँग्रेसच्या आरोपानंतर राज्य निवडणूक आयोगाने ‘लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का?’ अशी राज्य सरकारला विचारणा केली आहे. त्यावर राज्याच्या मुख्य सचिवांना सोमवारी सकाळी ११:०० पर्यंत याबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, लाडकी बहीण योजनेंतर्गत दोन महिन्यांचे पैसे महापालिका निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे १४ जानेवारीला बँक खात्यात जमा केले जाणार असल्याच्या काँग्रेसचा दावा आहे. मात्र आता काँग्रेसने केलेल्या मागणीची निवडणूक आयोगाने दखल घेतल्याने आता लाडक्या बहिणींना संक्रांतीला भेट मिळणार की नाही यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे.
दुसरीकडे, अजित पवार यांनी निवडणूक आयोगाने सांगितले तर, आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढे ढकलू, असेही सांगितले आहे.















Discussion about this post