मुंबई । मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने मार्फत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात असून अशातच आता लाडक्या बहिणींसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठी घोषणा केली आहे. आता लाडकी बहीण योजनेसोबतच सरकार नवीन योजना सुरु करण्याच्या विचारात असून यासाठीचा संपूर्ण प्लान अजित पवारांनी सांगितला आहे.
लाडक्या बहिणींना त्यांचा स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल देण्याचा विचार केला जत आहे. सरकार बँकांनी चर्चा करणार आहे. महिलांना उद्योगासाठी भांडवल म्हणून ३० ते ४० हजार रुपये देण्याचा विचार केला जात आहे. या महिलांना दिले जाणारे १५०० रुपये बँकांकडे जमा होतील, असा हा प्लान आहे.
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार यांनी सांगितलं की, लाडक्या बहिणींना मला सांगायचं आहे की कधीकधी आमच्याबद्दल गैरसमज पसरवतात. लाडक्या बहिणींना दर महिन्याला १५०० रुपये देतो. ज्या लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी योजना कधीच बंद होणार नाही. या योजनेतून महिलांना मदत होते. आम्ही आणखी एक प्रस्ताव आणलेला आहे. यासंदर्भात बँकांशी बोलणं सुरु आहे.
काही जिल्हा मध्यवर्ती बँका चांगल्या आहेत. १५०० रुपये महिलांना दिले जातात. त्याऐवजी ३० ते ४० हजार रुपये महिलांना द्यायचे. हप्ता लाडकी बहीण योजनेतून जाईल. जर महिलांना भांडवल मिळालं तर त्या व्यवसाय सुरु करु शकतात. यातून तिचं कुटुंब ती उभं करु शकेल. महाराष्ट्रातील काही बहिणींनी हे केलं आहे. तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा. आम्ही हा कार्यक्रम देणार आहे. त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे, असं अजित पवारांनी सांगितलं.
Discussion about this post