जळगाव । जळगाव जिल्ह्यातून आणखी एक लाचखोरीची मोठी बातमी समोर आलीय. एरंडोल तालुक्यातील निपाणेतील श्री संत हरिहर माध्यमिक हायस्कूलच्या मुख्याध्यापकाला तीन हजार सहाशे रुपयांच्या लाच मागणी प्रकरणी जळगाव एसीबीने अटक केली आहे. संदीप प्रभाकर महाजन (45) असे गुन्हा दाखल झालेल्या व अटकेतील मुख्याध्यापकाचे नाव आहे.
यातील तक्रारदार संत हरिहर महाराज माध्यमिक विद्याल, निपाणे, ता. एरंडोल, जि. जळगाव या शाळेत शिपाई असून आलोसे हे सदर शाळेचे मुख्याध्यापक आहेत. तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीचे 23815/-रुपयाचे मेडिकल मंजूर होनेकामी आलोसे यांच्याकडे सादर केले होते. सदर मेडिकल बिल स्वतःचे वैयक्तिक ओळखीने सिव्हिल हॉस्पिटल जळगाव व वेतन अधीक्षक माध्यमिक शिक्षण विभाग जळगांव यांच्याकडे प्रस्ताव सादर करून मंजूर करून देण्याचे मोबदल्यात आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे 5000/- रुपये लाचेची मागणी केली बाबत तक्रारदार यांनी दिनांक 21/12/2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता आलोसे यांनी तक्रारदार यांच्या पत्नीचे 23815/-रुपयांचे मेडिकल बिल मंजूर करून आणून देण्याचे मोबदल्यात तडजोडी अंती सदर मेडिकल बिलाच्या एकूण रकमेच्या 15 %प्रमाणे 3600/-रुपयांची लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला. म्हणून आलोसे यांचे विरुद्ध कासोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.
यांनी केली कारवाई
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, एएसआय सुरेश पाटील, किशोर महाजन, बाळू मराठे, प्रदीप पोळ आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
Discussion about this post