भुसावळ । दारू विक्री करण्यासाठी व तक्रारदार यांना त्रास न देण्यासाठी प्रथम 50000 ची मागणी करून तडजोड अंती 30000 रुपयाची लाचेची रक्कम स्वीकारताना भुसावळच्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील उप निरीक्षकासह खाजगी इसमास एसीबीने आज रंगेहात अटक केली. या कारवाईने मोठी खळबळ उडाली.
याबाबत असं की, तक्रारदार यांच्याकडून 19/11/2024 रोजी किरण सोनवणे (वय 39 वर्षे, व्यवसाय नोकरी, उप निरीक्षक, नेम. राज्य उत्पादन शुल्क विभाग, भुसावळ ( वर्ग 2) व त्याचेसोबत असलेल्या किरण माधव सुर्यवंशी, (वय 37,धंदा – मजुरी, रा. हुडको कॉलनी भुसावळ ( खाजगी इसम) यांने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने तक्रारदार यांचे घरी जाऊन अवैध दारू विक्री बाबत छापा टाकला होता.
सदरचा छापा मध्ये तक्रारदार यांचेकडेस असलेला 30 ते 35 हजार रुपये किंमतीच्या दारुच्या बाटल्या जप्त केल्या होत्या व दारूची केस न करण्यासाठी 10 हजार रुपये घेतले होते. दारूची केस न करण्यासाठी तक्रारदार यांच्या कडून 50 हजार रुपये ची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी आज दिनांक 22/11/2024 रोजी तक्रारदार यांनी समक्ष लाप्रवि जळगांव यांना तक्रार दिली होती. सदर तक्रारीची पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता पडताळणी कारवाई दरम्यान दोन्ही आरोपीनी दारू विक्री करण्यासाठी व तक्रारदार यांना त्रास न देण्यासाठी प्रथम 50000 ची मागणी करून तडजोड अंती 30000 रुपयाची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. आज दि.22 रोजी यातील खाजगी इसम किरण माधव सुर्यवंशी यास 30000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्यावर फैजपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.















Discussion about this post