धुळे । नरडाणा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला दोन हजारांच्या लाच प्रकरणी ताब्यात घेण्यात आले. गजेंद्र पावरा असे या कॉन्स्टेबलचे नाव असून त्यास सुमारे ५० हजार रुपये पगार आहे. त्याच्या विरोधात नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर उशिरापर्यंत पावरा याच्या घराची झडती सुरू होती.
असे आहे लाच प्रकरण
32 वर्षीय तक्रारदार हे मौजे दोंदवाडा, ता.शिरपूर येथील रहिवासी आहेत. त्यांचा चुलत भाऊ तक्रारदार यांच्या मोटारसायकलने दोंदवाडे गावातून धुळे येथे जात असतांना मुंबई-आग्रा महामार्गावरील नरडाणा येथील पुलावर मोटारसायकल घसरल्याने अपघात घडला होता. अपघातानंतर दुचाकी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्यानंतर त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल पावरा यांची भेट घेतली.
त्यावेळी पावरा यांनी दुचाकी सोडण्यासाठी पाच हजारांची लाच मागून दोन हजार रुपये स्वीकारण्याची दर्शवली. याबाबत 17 डिसेंबर 2024 रोजी एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आल्यानंतर लाच मागणी सिद्ध झाली मात्र कर्मचार्याला संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही. एसीबीला लाच मागणीचा अहवाल प्राप्त होताच बुधवारी संशयीतास अटक करण्यात आली तसेच मोबाईल जप्त करण्यात आला. संशयीताविरोधात नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
Discussion about this post