जळगाव । वडिलांच्या नावे असलेल्या फर्मच्या पीएफ थकबाकीच्या सेटलमेंटसाठी २५ हजारांची लाच घेताना जळगावच्या पीएफ कार्यालयातील मुख्य वित्त व लेखाधिकाऱ्याला पुण्याच्या सीबीआयने रंगेहाथ अटक केली.
येथील पीएफ कार्यालयातील लाचेची ही पहिलीच कारवाई आहे. लाच घेणारा संबंधित अधिकारी २२ महिन्यांनंतर निवृत्त होणार आहे. रमण वामन पवार (वय ५८, ह. रा. शनिपेठ, जळगाव) असे या लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार सचिन माळी यांच्या वडिलांच्या नावाने कामगार पुरवठा करणारी फर्म आहे. ती दोन वर्षांपासून बंद स्थितीत आहे. या फर्मचे लेखापरीक्षण करण्यासंदर्भात पीएफ कार्यालयाकडून माळी यांना नोटीस बजावली होती. त्यानुसार रमण पवार यांच्यामार्फत लेखापरीक्षणही केले. मात्र, त्यांनी माळी यांना लेखापरीक्षणाचा अहवाल दिला नाही
. याबाबत विचारणा केली असता पवार यांनी त्यात काही त्रुटी असल्याचे सांगितले. मार्च २०२३च्या पीएफच्या पेमेंटमध्ये चूक आहे. फर्मच्या पीएफ थकबाकीच्या सेटलमेंटसाठी सुरुवातील ५० हजारांची मागणी पवार यांनी केली. त्यानंतर तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, माळी यांनी याबाबत पुणे येथील सीबीआय कार्यालयाकडे तक्रार नोंदवली. त्यानूसार हा सापळा रचण्यात आला.
Discussion about this post