कोकण रेल्वेने काही रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
कोणती पदे भरली जाणार?
1) सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil) 05
2) सिनियर सेक्शन इंजिनिअर (Electrical) 05
3) स्टेशन मास्टर 10
4) कमर्शियल सुपरवाइजर 05
5) गुड्स ट्रेन मॅनेजर 05
6) टेक्निशियन III (Mechanical) 20
7) टेक्निशियन III (Electrical) 15
8) ESTM-III (S&T) 15
9) असिस्टंट लोको पायलट 15
10) पॉइंट्स मन 60
11) ट्रॅक मेंटेनर-IV 35
या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे. इंजिनियरिंग किंवा संबंधित क्षेत्रातून ITI पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असेल.
वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: कोकण रेल्वे
Fee: ₹59/-















Discussion about this post