जळगाव । अज्ञात वाहनाने धडक दिल्यांनतर गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या खाली अडकल्याने कीर्तनकाराचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरानजीकच्या शिरसोली रस्त्यावर घडली. कैलास प्रकाश कोळी (वय-२२, रा.खर्डी ता. चोपडा) असे मयत झालेल्या कीर्तनकाराचे नाव आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कैलास कोळी हे आपल्या परिवारासह चोपडा तालुक्यातील खर्डी येथे वास्तव्याला आहे. ते कीर्तनकार असून कीर्तन करून आपला उदरनिर्वाह करत होते. शनिवार २३ डिसेंबर रोजी त्यांचे पाचोरा येथे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. रात्री ११ वाजता कीर्तन संपल्यानंतर ते दुचाकीने चोपडा येथे येत असताना जळगाव शहरानजीकच्या शिरसोली रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेनंतर कोळी हे ट्रकच्या चाकाखाली जाऊन अडकले. यात त्यांचा मृत्यू झाला.
धडकेत त्यांचा उजवा पाय कापला गेला. तर आजूबाजूच्या नागरिकांनी व मंत्री गिरीश महाजन यांचे आरोग्यदूत शिवाजी पाटील यांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना पहाटे कैलास कोळी यांचा मृत्यू झाला आहे. नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.















Discussion about this post