बीडच्या शिरूर तालुक्यात भाजप पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याच्या घरावर पोलीस आणि वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. यावेळी त्याच्या घरात काही धक्कादायक गोष्टी आढळून आल्या आहेत.
खोक्याच्या घरी काय काय सापडले?
पोलीस आणि वनविभागाकडून आज खोक्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली, समोर आलेल्या माहितीनुसार खोक्याच्या घरामध्ये वन्य प्राणी पकडण्यासाठी वाघूर चित्र पकडण्याचे जाळे, एक सतुर, एक सुरी, एक जर्मनचा डब्बा या डब्यामध्ये चरबी आढळून आली आहे दोन पुड्या गांजा आढळून आला आहे. 400 ते 500 ग्राम गांजा असेल पुडी आढळली आहे. घरात वाळलेले मांस आढळून आले आहे.
ही कार्यवाही जिल्हा वन अधिकारी अमोल गरकळ यांच्या नेतृत्वाखाली 40 अधिकाऱ्यांच्या टीमने ही धाड टाकली. दरम्यान शिरुर तालुक्यातील नागरिक आता चांगलेच आक्रमक झाले असून, उद्या शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे.
नेमकं काय म्हणाले ग्रामस्थ?
बावी गावचे रहिवासी दिलिप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांच्या रानात सतीश उर्फ खोक्या भोसले याने हरणाची शिकार करण्यासाठी जाळ लावलं होतं. त्यात एक हरण अडकलं. ते हरण सोडवण्यासाठी तिथे ढाकणे कुटुंब पोहोचलं तर त्याने ढाकणे कुटुंबातील वडील आणि मुलाला बेदम मारहाण केली. मुलाचे दात पाडले, वडिलांच्या फासोळ्या मोडल्या. दिलीप ढाकणे यांच्या मुलाचा पाय मोडून तुकडे -तुकडे केले. आम्ही उद्या मोर्चा काढणार आहोत, पोलीस आरोपीला अटक करत नाहीत, नेमकी त्यांना काय अडचण आहे? असा सवाल यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना ग्रामस्थ म्हणाले की, खोक्या आणि खोक्याच्या आकावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. खोक्याचे आका आष्टीत आहेत. हे प्रकरण दाबलं जात आहे. कुटुंबाला ब्लॅकमेल करण्यात येत आहे, असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान अधिकाऱ्यांकडून माहिती मागवली असून, खातरजमा करून कारवाई होईल अशी माहिती या प्रकरणावर बोलताना गणेश नाईक यांनी दिली आहे.
Discussion about this post